पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यानधारणेवर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदर्श संहितेच्या 48 तासांच्या मौन कालावधीच्या तरतुदीचे उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. तर यावर आता भारतीय जनता पक्षाच्या खासदार पवित्रा मार्गेरिटा यांनी मोदींच्या ध्यानधारणेला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.
पवित्रा मार्गेरिटा म्हणाले, “फक्त गांधी वढेरा कुटुंबालाच माहित आहे की त्यांचा अजेंडा काय आहे. पण भारतातील नागरिक ध्यानधारणेसाठी कुठेही जाऊ शकतो आणि ही भारताची दीर्घकाळापासूनची संस्कृती आहे. मला काँग्रेस पक्षासाठी हे दयनीय वाटते जेव्हा प्राण प्रतिष्ठा आयोजित केली होती तेव्हा राहुल गांधी संवेदनशील भागात फिरत होते, त्याला त्यांनी विरोध केला. तसेच आता पंतप्रधान किंवा कोणताही नागरिक जेव्हा ध्यानासाठी जातो किंवा पूजा किंवा योग करतो तेव्हा या प्रश्नाचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही. काँग्रेस काय करत आहे?”, असे मार्गेरिटा म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधानांच्या मौनाबद्दल काँग्रेसने भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन दिवसीय ध्यान शिबिर लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी आदर्श आचारसंहितेच्या ’48 तासांच्या मौन कालावधीच्या तरतुदीचे’ उल्लंघन करेल असा आरोप करण्यात आला आहे.