Brijbhushan Singh : काल (30 मे) गोंडा येथे भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील एका गाडीचा मोठा अपघात झाला. करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील एसयूव्हीने दोन तरूणांना आणि एक महिलेला जोरात धडक दिली. या अपघातात चिरडल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तर या अपघाताबाबत आता ब्रिजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ब्रिजभूषण सिंह यांनी या प्रकरणाची जबाबदारी चालक घेणार नाही, तर माझा मुलगा घेणार असल्याचे सांगितले. ब्रिजभूषण म्हणाले की, जे काही घडले ते अतिशय दुःखद आहे, असे घडायला नको होते. पोलिसांनी आरोपी चालकाला अटक करून कारागृहात पाठवले आहे. त्यामुळे या अपघाताची जबाबदारी माझा मुलगा नाही तर चालक घेईल, असे ते म्हणाले.
दरम्यान, बुधवारी करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील एका वेगवान एसयूव्हीने दुचाकीस्वार रेहान खान आणि शेहजाद खान या दोन चुलत भावांना ठार केले. तर यावेळी एक महिलाही गंभीर जखमी झाली. जखमी महिला सीता देवी (60) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.