गेले काही दिवसांपासून देशातील विमाने, शाळा आणि मोठी
रुग्णालये यांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या असल्याचे ईमेल प्राप्त होत आहे. तपास
केल्यानंतर ते ईमेल अफवा पसरविण्यासाठी केल्याचे समजते. अशीच एक घटना दिल्लीवरून
श्रीनगरला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी
तातडीने तपास सुरु केला. विमान श्रीनगरमध्ये लँड झाल्यानंतर त्याची कसून तपासणी
करण्यात आली.
श्रीनगर येथे विमान लॅंड झाल्यावर
त्याची कडक तपासणी करण्यात आली. त्यानंतर ही धमकी खोटी असल्याचे समोर आले.
दिल्लीवरून श्रीनगरला जाणाऱ्या Vistara विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीचा संदेश
मिळाला. या विमानांमधून १७७ प्रवासी प्रवास करत होते. बॉम्बची धमकी मिळताच विमान
कंपनी आणि सुरक्षा दलांनी यावर तंतिज्ञे कारवाई करत, संपूर्ण
विमानाची कसून तपासणी केली. मात्र ही धमकी खोटी निघाल्याने प्रवाशांसह सर्वानीच
सुटकेचा निश्वास सोडला.