PM Narendra Modi : आज (1 जून) लोकसभा निवडणूक 2024 चा शेवटचा म्हणजेत सातवा टप्पा आहे. आजच्या या शेवटच्या टप्प्यात सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या एकूण 57 जागांसाठी मतदान होत आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहेत.
तर आजच्या या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटले की, “आज 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा आहे. मला आशा आहे की तरुण आणि महिला मतदार विक्रमी संख्येने त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील. एकत्र मिळून आपली लोकशाही अधिक चैतन्यशील आणि सहभागी बनवूया”, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
https://x.com/ANI/status/1796716764757459047
दरम्यान, आजच्या सातव्या टप्प्यात पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये मतदान होत आहे. त्यामुळे आज 904 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे.