Weather Updates : गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात उन्हाचा तडाखा सतावत आहे. तर आता उष्णतेपासून सर्वांना लवकरच दिलासा मिळणार आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर इतर अनेक राज्यांमध्ये हवामान झपाट्याने बदलले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेल्या दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, दिल्ली-एनसीआरमध्येही पावसाची अपेक्षा आहे, ज्यामुळे तापमान आणखी खाली येईल आणि लोकांना उष्णतेपासून नक्कीच दिलासा मिळेल.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शनिवारी (01 जून) दुपारनंतर ताशी 25 ते 35 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, तर दोन दिवस धुळीचे वादळ राहण्याची शक्यता आहे. यासोबतच दिल्ली-एनसीआरसह अनेक राज्यांमध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
IMD च्या ताज्या अपडेटनुसार, 1 जून रोजी धुळीचे वादळ आणि 2 जून रोजी दिल्लीत वादळाची शक्यता आहे. हवामानातील बदलामुळे तापमानात झपाट्याने घट होईल. या काळात किमान तापमान 29 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस राहील, असे भारतीय हवामान खात्याने आपल्या अंदाजात म्हटले आहे.