विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज राजधानी नवी दिल्लीत बैठक होत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी दुपारी ३ वाजता बैठक होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, एम के स्टॅलिन , मेहबुबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला यासह इतर पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन हेही या बैठकीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. आज दुपारी 2 वाजल्यापासून इंडिया आघाडीची बैठक आहे. दरम्यान आमची युती आणि निवडणुकांच्या निकालाबाबत या बैठकीत चर्चा होईल, इंडिया आघाडीला चांगल्या जागा मिळतील असे झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी म्हटले आहे.
या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या रणनीती बाबत चर्चा केली जाणार आहेत. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनजी यांनी या बैठकीपासून लांब राहणे पसंत केले आहे.मात्र त्यांचा प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित असणार आहे. तसेच उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे हे परदेशात असल्याने त्यांचे प्रतिनिधी म्हणून संजय राऊत या बैठकीला उपस्थित असतील.