LPG Cylinder Price : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये त्याची किंमत आता 1676.00 रुपये झाली आहे जी पूर्वी 1745.50 रुपयांमध्ये उपलब्ध होती. अशाप्रकारे तो 69.50 रुपयांनी कमी झाला आहे. मात्र घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 14 किलोच्या एलपीजी सिलिंडरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दिल्लीतील सामान्य ग्राहकांसाठी त्याची किंमत 803 रुपये आहे तर उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी त्याची किंमत 603 रुपये आहे. आता 19 किलोचा सिलेंडर कोलकात्यात 1787 रुपये, मुंबईत 1629 रुपये आणि चेन्नईमध्ये 1840 रुपयांना मिळणार आहे. कमी झालेले दर आजपासून लागू झाले आहेत. १९ किलोच्या सिलेंडरला हलवाई सिलिंडर असेही म्हणतात. तर व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत सलग तिसऱ्या महिन्यात कपात करण्यात आली आहे.
यापूर्वी एप्रिल आणि मे महिन्यातही 19 किलोच्या सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये भाव वाढले होते. यासोबतच आजपासून ऑटो गॅस आणि एटीएफच्या किमतीतही बदल करण्यात आला आहे.