भारताच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या कन्याकुमारीतील ‘विवेकानंद मेमोरिअल रॉक’ या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 45 तास ध्यानधारणा करत होते. . आता काही वेळा पूर्वी ही ध्यानधारणा पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे 45 तासांच्या ध्यानधारणेची सांगता केली
लोकसभा प्रचाराची सांगता झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचे गुरुवारी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे आगमन झाले.जिथे स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केले होते. त्याच शिळेवर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्यान करतानाचे फोटो समोर आले होते.पंतप्रधान ध्यान मंडपम येथे ध्यान करत होते, जेथे आदरणीय हिंदू तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद यांना ‘भारत माता’ बद्दल दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती. ध्यान संपल्यानंतर . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारळ पाणी आणि द्राक्षांचा ज्यूस घेतला.
45 तासांची ध्यानधारणा पूर्ण झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी एका विशेष ठिकाणाला भेट दिली आहे . दक्षिण भारताचे संत कबीर नावाने ओळखले जाणारे तमिळ संत-कवी तिरूवल्लूर यांच्या यांच्या प्रतिमेला हार अर्पण करत त्यांना अभिवादन केले आहे.