Exit Poll 2024 : नवी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीत काय चर्चा झाली आणि इंडिया आघाडीला किती जागा मिळतील याचा आकडा जाहीर केला आहे.
इंडिया आघा़डीला 295 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा मल्लिकार्जुन खरगेंनी केला आहे. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आज भाजप आणि त्यांचे लोक एक्झिट पोलवर चर्चा करतील आणि एक नरेटिव्ह तयार करतील. पण यावरून लोकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून आम्ही खरं काय आहे ते देशवासियांना सांगू इच्छितो. इंडिया आघाडीला 295 पेक्षा अधिक जागा मिळतील. आमच्या आघाडीच्या सर्व नेत्यांच्या चर्चेनंतर आम्ही याचं आकलन केलं आहे. त्यावरून आम्हाला हा आकडा मिळाला आहे, असे खरगे म्हणाले.