निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात एक्झिट पोल येऊ लागले आहेत. यापैकी बहुतांश ठिकाणी एनडीए पुन्हा केंद्रात सरकार स्थापन करणार आहे. इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार केरळमध्ये भाजप 2-3 जागांसह आपले खाते उघडणार आहे.
इंडिया न्यूज-डी-डायनॅमिक्स एक्झिट पोलनुसार, इंडिया न्यूज-डी-डायनॅमिक्सने आपल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएच्या पुनरागमनाची शक्यता व्यक्त केली आहे. या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 371 जागा मिळाल्याचे दाखवण्यात आले आहे. तर इंडिय आघाडीला 125 जागा मिळत आहेत. इतरांना 47 जागा मिळण्याची शक्यता आहे.
आजतकच्या सर्वेक्षणानुसार, बिहारमध्ये भाजपचे नुकसान होताना दिसत आहे. बिहारमध्ये भाजपला 13 ते 15 जागा मिळू शकतात. जेडीयूला 9 ते 11 जागा मिळू शकतात. एलजेपीआरला 5, आरजेडीला 6 ते 7 जागा, तर काँग्रेसला 1 ते 2 जागा मिळू शकतात. इतरांना 0 ते 2 जागा मिळू शकतात.
एबीपीच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात एनडीएला 22 ते 26 जागा मिळू शकतात, तर इंडिया आघाडीला 23 ते 25 जागा मिळू शकतात.
रिपब्लिक टीव्ही-पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार, एनडीए 359 जागांसह तिसऱ्यांदा सत्तेत परतत आहे. या एक्झिट पोलमध्ये इंडिया आघाडीला 154 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांना 30 जागा मिळाल्याचे दाखवले आहे.
– इंडिया टुडे- ॲक्सिस माय इंडियानुसार, बिहारमध्ये INDIA आघाडीला 48 टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे. राज्यातील 40 जागांपैकी एनडीएला 29-33 जागा मिळण्याची शक्यता आहे.
न्यूज 24- टुडेज चाणक्यने आपल्या लोकसभेच्या विश्लेषणात दिल्लीत भाजपला 7 पैकी 6 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. एक जागा इंडिया आघाडीला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मध्य प्रदेशात एनडीएला 29 जागा: मध्य प्रदेशात इंडिया आघाडीला 33 टक्के मते मिळणार आहेत. जागांच्या बाबतीत बोलायचे झाले तर राज्यात 29 जागांसह एनडीएला 28-29 जागा मिळणार आहेत. इंडिया आघाडीला 0-1 जागा मिळणार आहेत. इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडिया एक्झिट पोल इंडिया आघाडीला मध्य प्रदेशात 33 टक्के मते मिळणार आहेत.
इंडिया टुडे- ॲक्सिस माय इंडियाच्या मते, राजस्थानमधील लोकसभेच्या 25 जागांवर एनडीएला 51 टक्के मते मिळत आहेत, तर इंडिया आघाडीला 41 टक्के मते मिळत आहेत. एनडीएला 16-19 जागा मिळताना दिसत आहेत. याशिवाय इंडिया आघाडीला 5-7 जागा मिळत आहेत. सध्या राज्यातील सर्व 25 जागा एनडीएकडे आहेत.