देशात सध्या काही ठिकाणी पावसाळी तर काही ठिकाणी उन्हाळा जाणवत आहेत. उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. तर दक्षिण भारतात केरळ, तामिळनाडूमध्ये मान्सूनने हजेरी लावली आहे. केरळमध्ये दाखल झालेला मान्सून हळूहळू संपूर्ण देशात व्यापणार आहे. त्यानुसार देशात हवामानात बदल होताना दिसत आहे. यंदाच्या वर्षी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, प्रशांत महासागरावरील एल निनोचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे ला नीना सुरु झाल्यानंतर देशात मान्सूनची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आला आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. तसेच केरळमध्ये दाखल झालेला मान्सून १० ते १२ जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.