लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. ७ ही
टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले आहे. दरम्यान मतदानानंतर जे काही एक्झिट पोल समोर आले
आहेत, त्यानुसार एनडीएचे केंद्रात सरकार येणार आहे असे चित्र दिसत आहे.
म्हणजेच नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असे चित्र सर्व्हेनुसार
पाहायला मिळत आहे. दरम्यान निकालानंतर भाजपामध्ये देखील काही बदल पाहायला मिळू
शकतात.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपामध्ये
राष्ट्रीय स्तरावर संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार देशात
मोदींचे सरकार येणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ ६
जून रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यानंतर त्यांच्या जागी नवीन नेत्याची निवड केली
जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतो. तसे
झाल्यास महाराष्ट्रात देखील भाजपात संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता आहे.