Shashi Tharoor : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास फक्त काही तासच शिल्लक राहीले आहेत. तर निकाल लागण्याअगोदर एक्झिट पोलनुसार देशात एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलनुसार एनडीए 400 जागा पार करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर इंडिया आघाडीच्या पदरी यावेळी निराशा पडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्या एक्झिट पोलवर सत्ताधारी आणि विरोधक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यामध्ये आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी इंडिया आघाडीला जास्त जागा मिळणार असल्याचा दावा केला आहे.
शशी थरूर म्हणाले की, एक्झिट पोल हे काही खरं नाही. इंडिया आघाडीने वाईटात वाईट कामगिरी केली तरी 2019 च्या तुलनेत त्यांची कामगिरी चांगली आहे. तसेच पोलमध्ये दाखवण्यात आलेल्या आकड्यांचा सर्वसामान्य जनतेच्या प्रक्रियेशी काहीही संबंध नाही.
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीपेक्षा काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष चांगली कामगिरी करतील. जर काँग्रेसच्या जागा तीन अंकांमध्ये असतील तर इंडिया आघाडी 295 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास शशी थरूर यांनी व्यक्त केला आहे.