पाकिस्तानमधल्या हैदराबादच्या प्रीताबाद भागात द्रव पेट्रोलियम गॅस सिलिंडर भरण्याच्या दुकानात सोमवारी झालेल्या स्फोटात मृतांची संख्या 12 वर गेली आहे, कारण आणखी दोन जखमींचा मृत्यू झाला आहे,अशी माहिती समोर येत आहे.
नीरुणकोटच्या UC-8 मधील मीर नबी बक्स टाउन रोडलगत एका हॉस्पिटलच्या तळमजल्यावर LPG सिलेंडर भरण्याच्या दुकानात स्फोट झाला.
कराची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता ११ जखमींवर उपचार सुरू आहेत, त्यापैकी सात गंभीर जखमी आहेत. तसेच किमान 60 जण यात गंभीर रीतीने भाजले असून त्यांना कराचीला हलवण्यात आले आहे. .
सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली यांनी मंत्र्यांसह बर्न्स वॉर्डला भेट दिली आणि जखमींच्या प्रकृतीबद्दल चौकशी केली असल्याचे सांगण्यात आले आहे.