लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या देशात कोणाची सत्ता येणार आहे याचा फैसला होणार आहे. १ जून रोजी अखेरच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार एनडीएला पुन्हा एकदा सत्ता मिळणार असे चित्र दिसत आहे. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. दरम्यान एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, आज शेअर मार्केटमध्ये देखील उसळी पाहायला मिळत आहे.
शेअर मार्केटमधील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सरकार स्थापन झाल्यानंतर, मंत्र्यांच्या खात्यांचे वाटप झाल्यानंतर तसेच जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर मार्केटमध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. MK Ventures चे संस्थापक मधुसूदन केला यांनी भारताच्या संभावनांबद्दल आणि विविध क्षेत्रांमध्ये सतत वाढ आणि विकासाच्या संभाव्यतेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन व्यक्त केला आहे.