लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच सेन्सेक्स लाल रंगात उघडला आहे. सध्या १३४२.२२ अंकांनी घसरून ७५,१२६.५६ वर ट्रेंड करत आहे. स्टॉक एक्सचेंजचे सर्व प्रमुख बेंचमार्क निर्देशांक घसरले. मंगळवारी (4 जून) NSE निफ्टी 650 अंकांनी, सेन्सेक्स 2200 अंकांनी घसरला. लोकसभा निकालापूर्वीच शेअर बाजारावर त्याचा परिणाम पाहायला मिळाला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे कल हाती आले असून सध्या एनडीए २५० हून जास्त जागांवर आघाडीवर तर इंडिया आघाडी २०० हून जास्त जागांवर आघाडीवर आहे. याचाच परिणाम शेअर बाजारावर झालेला दिसत आहे.
एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाल्यानंतर सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळली होती. जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी एनडीएच्या बाजूने बहुमत असेल, असे अंदाज वर्तविले होते. मात्र प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आज ४ जून रोजी सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स १५०० अकांच्या घसरणीसह उघडला. सुरुवातीला १३४२ अंकांची घसरण होती ती वाढून १५०० वर पोहोचली. दुसरीकडे निफ्टीही ८४ हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला आणि त्यात आणखी घसरण झाली. आतापर्यंत निफ्टी ५३९ अंकांपेक्षा अधिक घसरून २२,७२४.८० वर पोहोचला आहे.