Share Market : आज सकाळपासून राज्यातील कल समोर येत आहेत. त्यामुळे देशात कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आज भाजप बहुमताचा आकडा गाठणार का? असा मोठा प्रश्न आहे. कारण सध्या भाजप 232 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
निकालाच्या कलानंतर सेन्सेक्स 3000 हून अधिक अंकांनी घसरला आहे. यामध्ये एलआयसी, एसबीआय आणि एचएएलसह रेल्वेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे.