यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये अतातटीची लढत पाहायला मिळत आहे. तर समोर आलेल्या कलानुसार काँग्रेस 95 जागांवर आघाडीवर आहे.
सध्या इंडिया आघाडीने 200 पेक्षा अधिक जागांवर अधिक आघाडी मिळवली आहे. या आघाडीनंतर तब्बल 10 वर्षांनी काँग्रेसच्या दिल्ली मुख्यालयात जल्लोषाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी दिल्ली मुख्यालयाबाहेर मोठा जल्लोष केला आहे.