निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असले तर भाजपाला वैयक्तिकपाने बहुमत गाठता आलेले नाही. तसेच महाराष्ट्रात देखील महायुतीला विशेष करून भाजपाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान एनडीएने २९२ जागांवर तर इंडिया आघाडीने २३४ जागांवर विजय मिळविला आहे. एनडीएमध्ये २९२ पैकी भाजपने एकूण २४० जागा जिंकल्या आहेत’ त्यामुळे जरी तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होणार असले तरी देखील त्यांना एनडीएतील घटक पक्षांची साथ घ्यावी लागणार आहे. दरम्यान आज दिल्लीत एनडीएचे बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान चंद्राबाबू नायडू यांनी आपण एनडीएसोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे.
तेलगू देसम पक्षाने आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेत आणि विधानसभेत चांगले यश मिळविले आहे. यावर बोलताना चंद्राबाबू नायडू म्हणाले, “मी देशात अनेक राजकीय बदल पाहिले आहेत. मी एनडीएमध्ये आहे. मी एनडीएच्या बैठकीला जात आहे. आणखी काही असेल तर आम्ही तुम्हाला कळवू,” चंद्राबाबू नायडू राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देत (एनडीए) विजयवाडा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीएच्या नियोजित बैठकीला उपस्थित राहण्यासाठी नायडू दिल्लीला रवाना झाले आहेत.