निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असले तर भाजपाला वैयक्तिकपाने बहुमत गाठता आलेले नाही. तसेच महाराष्ट्रात देखील महायुतीला विशेष करून भाजपाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान एनडीएने २९२ जागांवर तर इंडिया आघाडीने २३४ जागांवर विजय मिळविला आहे. एनडीएमध्ये २९२ पैकी भाजपने एकूण २४० जागा जिंकल्या आहेत’ त्यामुळे जरी तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होणार असले तरी देखील त्यांना एनडीएतील घटक पक्षांची साथ घ्यावी लागणार आहे. दरम्यान दिल्लीत एनडीएची बैठक संपली आहे. १६ पक्षांनी आपले समर्थन पत्र सोपवले आहे. दरम्यान या सर्व घडामोडीत आणखी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.
देशातील १० अपक्ष खासदार एनडीएच्या संपर्कात असल्याची बातमी समोर येत आहे. असे झाल्यास एनडीएची ताकद आणखी वाढणार आहे. दहा अपक्ष खासदारांनी अमित शहा यांच्याशी संपर्क साधला आहे. सरकार बनवताना देशभरातील दहा खासदार भाजप सोबतच राहणार असल्याचे समजते आहे. असे झाल्यास एनडीएचे ताकद वाढणार असून, इंडिया आघाडीला मोठा धक्का बसू शकतो.