निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असले तर भाजपाला वैयक्तिकपाने बहुमत गाठता आलेले नाही. तसेच महाराष्ट्रात देखील महायुतीला विशेष करून भाजपाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान एनडीएने २९२ जागांवर तर इंडिया आघाडीने २३४ जागांवर विजय मिळविला आहे. एनडीएमध्ये २९२ पैकी भाजपने एकूण २४० जागा जिंकल्या आहेत’ त्यामुळे जरी तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होणार असले तरी देखील त्यांना एनडीएतील घटक पक्षांची साथ घ्यावी लागणार आहे. दरम्यान दिल्लीत एनडीएची बैठक संपली आहे. १६ पक्षांनी आपले समर्थन पत्र सोपवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.
या बैठकीला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, भाजप नेते अमित शहा, राजनाथ सिंह, जनता दल (युनायटेड) प्रमुख नितीश कुमार यांच्यासह भाजपचे मित्रपक्ष, तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) एन चंद्राबाबू नायडू, शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे, जनता दल (युनायटेड) प्रमुख उपस्थित होते. तसेच धर्मनिरपेक्ष) नेते एचडी कुमारस्वामी, जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण, लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल हे नेते देखील उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीएकडून सरकार स्थापनेवर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून रोजी पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत.दरम्यान एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांना एनडीएचे प्रमुख नेता म्हणून मान्यता देण्यात आली आहे.