पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय जनता पक्षाच्या बंगालमधल्या कार्यकर्ते आणि नेते यांच्यात वाद वाढण्याची शक्यता आहे. दिसून येत असलेल्या मतभेदादरम्यान, दिग्गज नेते दिलीप घोष यांच्या वक्तव्यामुळे पक्षात जुने विरुद्ध नवे असा नवा वाद सुरू होण्याची शक्यता बळावली आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या X वरील विधानाचा हवाला देत घोष यांनी लिहिले, “एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पक्षाच्या सर्वात जुन्या कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. गरज भासल्यास नवीन दहा कार्यकर्ते बाजूला कार, कारण जुने कार्यकर्तेच विजयाची हमी असतील. नवीन कार्यकर्त्यांवर लवकर विश्वास ठेवू नये.”
वर्धमान-दुर्गापूर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या कीर्ती आझाद यांनी घोष यांचा सुमारे १.३८ लाख मतांनी पराभव केल्यानंतर भाजप नेत्याने ही टिप्पणी केली.
घोष यांनी पत्रकारांना असेही सांगितले की, आता हे स्पष्ट झाले आहे की त्यांना जुन्या मतदारसंघाऐवजी नवीन जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी पाठवणे ही चूक होती.
मेदिनीपूरचे खासदार असणाऱ्या घोष , यांना वर्धमान-दुर्गापूर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले, जिथे त्यांना तृणमूल काँग्रेसला कडवी झुंज देण्याची अपेक्षा होती.
तर घोष यांचा वर्धमान-दुर्गापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार एस.एस. अहलुवालिया यांच्या जागी त्यांना मैदानात उतरवण्यात आले. अहलुवालिया यांना आसनसोलमधून तिकीट देण्यात आले. घोष यांच्या जागी भाजपने आसनसोल दक्षिणमधून उतरवलेल्या विद्यमान आमदार अग्निमित्र पॉल यांना तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांकडून पराभवाचा सामना करावा लागला.
पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवारांच्या फेरबदलाला अंतिम मंजुरी दिली असून त्यात राज्याचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचा मोठा हात असल्याचे मानले जात आहे. 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दुर्गापूरमधून मला उमेदवारी देण्याचा निर्णय चुकीचा होता, असे घोष यांनी पत्रकारांना सांगितले आहे , ते म्हणाले की, “दुर्गापूरमधून मला उमेदवारी देण्यात आली पण मी अपयशी ठरलो.” ‘ दिलीप घोष यांनीही आता राज्यात दौरे करून जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.
या घडामोडीवर तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले की, “मी नेहमीच दिलीप घोष यांना भाजपचा खरा कार्यकर्ता मानतो. त्यांचा पक्ष स्वत:चे गुण ओळखण्यात अपयशी ठरला हे त्यांचे दुर्दैव आहे. आम्ही त्यांचा पराभव केला हे चांगले आहे पण त्यांच्या पक्षाकडून त्यांना अधिक चांगल्या अपेक्षा होत्या हे खरे आहे” .