मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी इथे उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मात्र त्यांची तब्येत ढासळत चालली आहे. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना उपचाराचा सल्ला दिला आहे. मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
“आपले आमरण उपोषण सुरू आहे तरी सरकार जाणूनबुजून बैठका घेत आहे.सरकारला काळजी असती तर त्यांनी दखल घेतली असती. मात्र त्यांनी अद्याप दखल घेतलेली नाही. त्यांना मराठे चांगला हिसका दाखवतील,’ असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. यादरम्यान, त्यांनी छगळ भुजबळ यांच्यावरही टिका केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये सकल मराठा समाज आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.