‘मुंज्या’ हा चित्रपट 7 जून रोजी प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत, परिणामी चित्रपटाने चार दिवसांत दमदार कलेक्शन केले आहे. शुक्रवारी आणि वीकेंडला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणाऱ्या ‘मुंज्या’ चित्रपटाच्या चौथ्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत.
‘मुंज्या’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4.21 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 81.25 टक्क्यांनी वाढ झाली आणि 7.40 कोटींचा व्यवसाय केला. Sacknilk च्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘मुंज्या’ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सुट्टीच्या दिवशी 8.43 कोटी रुपये कमवले. या चित्रपटाचे तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20.04 कोटी रुपये होते.
चौथ्या दिवशीची कमाई तिसऱ्या दिवसाच्या तुलनेत कमी असली तरी सोमवारी सुट्टी नसल्याने या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. सोमवारी या चित्रपटाने 3.75 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर 24.15 कोटींची कमाई केली आहे.
चित्रपटाची कथा कोकणातील लोकप्रिय असलेल्या मुंज्याच्या दंतकथेवर आधारित आहे. चित्रपटाचे चित्रीकरण कोकणात झाले आहे. या हिंदी चित्रपटात सुहास जोशी, अजय पुलीकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे यांच्यासह शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. मुंज्याच्या कथेभोवती चित्रपट फिरतो. हा चित्रपट कोकणातील लोककथेवर आधारित आहे.