18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून होणार आहे आणि 18 व्या लोकसभेसाठी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी ह्या दरम्यान पार पडणार आहे. तसेच 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे तसेच राज्यसभेचे 264 वे अधिवेशन देखील 27 जून रोजी सुरू होईल आणि 3 जुलै रोजी संपेल, असे ते म्हणाले आहेत.
https://x.com/KirenRijiju/status/1800738040169758797
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. राष्ट्रपती मुर्मू आपल्या अभिभाषणातून केंद्रातील मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा अजेंडा मांडणार आहेत.
17 व्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन (अर्थसंकल्पीय अधिवेशन) 31 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 दरम्यान पार पडले होते. लोकसभेच्या 274 बैठका झाल्या ज्यात 202 विधेयके मांडली गेली आणि 222 विधेयके मंजूर झाली. राज्यसभेच्या 271 बैठका झाल्या, ज्यामध्ये 31 विधेयके मांडण्यात आली आणि 220 विधेयके मंजूर झाली. 17 व्या लोकसभेच्या कार्यकाळात एकूण 221 विधेयके दोन्ही सभागृहांनी मंजूर केली होती.