लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी ( lieutenant general Upendra Dwivedi ) यांची लष्करप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या उपलष्करप्रमुख म्हणून कार्यरत असलेले लेफ्टनंट जनरल द्विवेदी ३० जून रोजी जनरल मनोज पांडे यांच्या जागी नवीन पदभार स्वीकारतील. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचा कार्यकाळ एक महिन्याने वाढवण्यात आला होता. ते आता ३० जून रोजी निवृत्त होत आहेत.
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे सध्या उपलष्करप्रमुख म्हणून कार्यरत असून ते जनरल पांडे यांच्यानंतरचे सर्वात वरिष्ठ अधिकारी समजले जातात.
1 जुलै 1964 रोजी जन्मलेले द्विवेदी 15 डिसेंबर 1984 रोजी भारतीय लष्कराच्या पायदळ (जम्मू आणि काश्मीर रायफल्स) मध्ये नियुक्त झाले होते. तसेच त्यांच्या सुमारे 40 वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित सेवेत त्यांनी विविध कमांड, स्टाफमध्ये काम केले आहे. लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी २०२२ ते२०२४ या कालावधीत महासंचालक इन्फंट्री आणि जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ (मुख्यालय उत्तर कमांड) अशी महत्त्वपूर्ण पदे भूषविली आहेत.