जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचं सत्र सुरूच आहे. कारण गेल्या 100 तासांत 4 दहशतवादी हल्ले झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा चकमक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जम्मू विभागातील डोडा जिल्ह्यात चकमक सुरू झाली आहे.
सध्या डोडा जिल्ह्यातील गंडोह तहसीलच्या तंतना येथे चकमक सुरू आहे. या चकमकीत एक एसओजी जखमी झाला आहे. धक्कादायक म्हणजे 100 तासांपेक्षा कमी काळातील ही चौथी दहशतवादी घटना आहे.
यापूर्वी कठुआ-भदेरवाह सीमेवर असलेल्या छत्रगलन टॉप येथील नाका पार्टीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या चकमकीत लष्कराचे पाच जवान आणि एसपीओ जखमी झाले आहेत.
दरम्यान, सुपवाल परिसरात पोलिसांना एक संशयास्पद ड्रोन सापडला आहे. पोलिसांनी हा ड्रोन ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरसेम लालचा रहिवासी बुर्ज तांडा सुपवाल यांच्या घराजवळ ड्रोन जप्त करण्यात आला आहे.