राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर आता राष्ट्रवादीकडून उमेदवाराचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीतील प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार जाणार आहेत. राज्यसभेसाठी आता सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.
सुनेत्रा पवार आज उमेदावरी अर्ज भरणार आहेत. तर सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त जागेवर राज्यसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तर यासाठी गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आणि सुनेत्रा पवार यांच्या नावाच्या चर्चा सुरू होत्या. अशातच आता सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळ्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याचं म्हटलं जातंय.
राष्ट्रवादीमधून राज्यसभेच्या जागेसाठी अनेकजण इच्छूक होते. यामध्ये छगन भुजबळ, सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार, बाबा सिद्दिकी, आनंद परांजपे ही नावे समोर आली होती. तर आता यामध्ये सुनेत्रा पवार यांनी बादी मारली आहे.