NEET परीक्षेतील (NEET Exam) हेराफेरीच्या आरोपांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आलेल्या तीन याचिकांवर आज सुनावणी पार पडली. NEET परीक्षा आयोजित करणारी संस्था NTA कडून विद्यार्थ्यांना परीक्षेत दिलेल्या वाढीव गुणांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद पार पडला. परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याबाबत याचिका सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून याचप्रकरणी सुनावणी पार पडली. आणि या दरम्यान परीक्षा पुन्हा घेतली जाईल ,विद्यार्थ्यांनी घाबरण्याची गरज नाही,असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
आज NEET UG हेराफेरी प्रकरणात विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून परीक्षेच्या निकालातील अनियमितता लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने NTA ला विद्यार्थ्यांना दिलेले ग्रेस गुण रद्द करून NEET परीक्षा पुन्हा घेण्याचे निर्देश दिले आहेत.
\ NEET-UG ला बसताना झालेल्या वेळेच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी 1,563 हून अधिक उमेदवारांच्या निकालांचे पुनरावलोकन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने उमेदवारांची स्कोअर कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आता फेरपरीक्षा परीक्षा 23 जून रोजी घेतली जाईल आणि 30 जूनपूर्वी निकाल जाहीर केला जाईल असा न्यायालयाचा निर्णय समोर आला आहे.
त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने पुनरुच्चार केला की ते NEET-UG, 2024 च्या समुपदेशनाला स्थगिती देणार नाही.
“समुपदेशन चालूच राहील आणि आम्ही ते थांबवणार नाही. जर परीक्षा झाली तर सर्व काही पूर्ण होईल त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही,” असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात ८ जुलै रोजी या याचिकांवर पुढील सुनावणी होणार आहे.
NEET-UG 2024 चे निकाल परत घेण्याचे निर्देश देण्यासाठी आणि 5 मे रोजी झालेल्या परीक्षेत पेपर फुटणे आणि गैरप्रकार झाल्याचा आरोप करून परीक्षा नव्याने घेण्याच्या निर्देशासाठी सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.यंदा झालेल्या नीट परीक्षेत मोठा अनागोंदी कारभार झाल्याचे समोर आले होते. राजस्थान, गुजरात आणि बिहार या राज्यात नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे सांगितले गेले. याबद्दलचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. राज्यात तर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या निकालाच्या विरोधात आंदोलने केली आहेत.
NTA द्वारे आयोजित NEET-UG परीक्षा ही देशभरातील सरकारी आणि खाजगी संस्थांमधील MBBS, BDS ,आयुष आणि इतर संबंधित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी मार्ग आहे.