नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी आता सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता लवकरच अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी काळजीपूर्वक नियोजन आणि सर्वसमावेशक विश्लेषणाच्या गरजेवर भर दिला आहे. या प्रस्तावनेचा उद्देश देशाच्या आर्थिक प्राधान्यक्रम आणि आव्हानांना पूर्णपणे संबोधित करणारा एक संतुलित अर्थसंकल्प सुनिश्चित करणे हा आहे. मोदी 3.0 अंतर्गत हा पहिला वार्षिक अर्थसंकल्प असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थसंकल्प जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात संसदेत सादर केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. तथापि, अर्थसंकल्पाच्या घोषणेची अधिकृत तारीख आणि वेळ संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळापत्रकानंतर अधिसूचित केली जाईल.