भारत देश दिवसेंदिवस नवीन उंची गाठत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत एक मजबूत आणि प्रभावी राष्ट्र म्हणून उदयास येत आहे. यामुळेच इटलीमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेमध्ये भारताला केंद्रस्थानी स्थान मिळाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी G 7 शिखर परिषदेत पोहोचले आहेत. यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. तर शुक्रवारी रात्री G-7 शिखर परिषदेच्या ‘आउटरीच टू नेशन्स’ सत्रात जागतिक नेत्यांनी कौटुंबिक फोटोसाठी पोझ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले ‘इटलीतील G7 शिखर परिषदेत जागतिक नेत्यांसह.’
https://x.com/narendramodi/status/1801688184570659323
पीएम मोदींनी हा फोटो शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक त्याची जोरदार चर्चा करत आहेत. या फोटोत पंतप्रधान मोदी स्टेजच्या मध्यभागी उभे असल्याचे दिसत आहेत. तर इटलीच्या पंतप्रधान मेलोनी स्वत: खालच्या रांगेत उभ्या होत्या. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेनही खाली उभे असल्याचे दिसले. त्याच्यासोबत इतर देशांचे प्रमुखही डावीकडे आणि उजवीकडे उभे असलेले दिसले. ग्रुप फोटोमध्ये पीएम मोदींचा सेंटर स्टेजचा फोटो पाहून सर्व देशवासियांना अभिमान वाटला आहे.
तर पंतप्रधान मोदींचा फोटो पाहून एका यूजरने लिहिले की, “सुंदर मोदीजी, आज तुमचा हा फोटो पाहून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून जाईल. खरे तर 140 कोटी भारतीयांनी एक दुर्मिळ हिरा निवडला आहे.” तर आणखी एका यूजरने ‘विश्व गुरु इंडिया’ असे म्हटले आहे.