सध्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एक सेल्फीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोन्ही नेते हसत हसत कॅमेऱ्याकडे बघताना दिसले. तर सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय
जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान मोदी यांच्या या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता या व्हिडीओवर स्वत:पंतप्रधान मोदींनीही प्रतिक्रिया दिली आहे. मेलोनी यांच्यासोबत सेल्फी व्हिडिओ पुन्हा पोस्ट करत मोदींनी लिहिले की, ‘भारत आणि इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध नेहमीच मजबूत आणि अखंड राहतील.’ सध्या मोदींची पोस्टही चांगलीच चर्चेत आली आहे.
https://x.com/narendramodi/status/1801894874343768425
दरम्यान, मागील काही वर्षात इटली आणि भारत यांच्यातील संबंध नवीन पातळीवर पोहोचले आहेत. असे मानले जाते की इटलीच्या भारताला भक्कम पाठिंब्यामुळे भारत-युरोप आर्थिक कॉरिडॉरमध्ये देशाचा प्रभाव आगामी काळात आणखी वाढेल. तसेच तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पीएम मोदींचा हा पहिलाच विदेश दौरा होता. येथे त्यांनी आपुलिया येथे G-7 शिखर परिषदेत भाग घेतला आणि जगभरातील मोठ्या नेत्यांची भेट घेतली. जागतिक नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान मोदींनी आपला दौरा यशस्वी असल्याचे वर्णन केले.