संसदेच्या परिसरात असणारे आणि महान नेते आणि स्वातंत्र्यसैनिकांचे पुतळे असलेले ‘प्रेरणा स्थळ’ तरुण पिढीला प्रोत्साहन देणारे असेल अशी प्रतिक्रिया मावळते लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे.
“संसदेच्या आवारात, आपल्या देशातील सर्व महान व्यक्ती, क्रांतिकारक, अध्यात्मवादी, नवचैतन्य जागृत करणारे सांस्कृतिक नेते यांचे पुतळे वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत. संसदेने हा निर्णय घेतला आहे कि ज्यामुळे ते सर्व पुतळे एकाच ठिकाणी लावण्यात यावेत. नियोजित आणि आदरपूर्वक, आणि तेथे एक ‘प्रेरणा स्थळ’ बांधले जावे जेणेकरुन भारताची लोकशाही पाहू इच्छिणाऱ्या अभ्यागतांना, भारतीय आणि परदेशी पर्यटकांना देखील त्यांच्याबद्दल माहिती मिळू शकेल,” ओम बिर्ला म्हणाले आहेत.
आज संध्याकाळी लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपसभापती आणि संसदीय कामकाज मंत्री यांच्या उपस्थितीत नवनिर्मित प्रेरणा स्थळाचे उद्घाटन होणार आहे.तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यावेळी उपस्थित असतील.
अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, राज्यसभा आणि लोकसभेच्या सर्व सदस्यांनाही कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
या महान भारतीयांच्या जीवनकथा आणि संदेश अभ्यागतांना नवीन तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळू शकेल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.स्वातंत्र्यसैनिकांचे आपल्या देशाच्या इतिहासात, संस्कृतीत, स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. या मुर्ती संकुलात वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने भाविकांना त्यांचे दर्शन घेणे अवघड झाले होते. त्यामुळे हे पुतळे संसद भवन संकुलात एकाच ठिकाणी बसवण्याच्या उद्देशाने प्रेरणा स्थळ बांधण्यात आले आहे.
याआधी नवीन संसद भवनाच्या बांधकामादरम्यान महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू आणि चौधरी देवी लाल यांचे पुतळे संकुलातील इतर ठिकाणी हलवण्यात आले होते.