पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. सियालदहहून जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने धडक दिली. या धडकेमुळे कांचनजंगा एक्स्प्रेसच्या अनेक बोगी रुळावरून घसरून अनेक फूट हवेत उड्या मारल्या. या घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून २०-२५5 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची माहिती देताना दार्जिलिंग पोलिसांचे अतिरिक्त एसपी अभिषेक रॉय म्हणाले, “या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून २०-२५ जण जखमी झाले आहेत. परिस्थिती गंभीर आहे. मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेसला धडकल्याने हा अपघात झाला.”
कांचनजंगा एक्सप्रेस आगरतळाहून सियालदहला जात होती. दार्जिलिंग जिल्ह्यातील रुईधासा येथे सकाळी ९ वाजता ही टक्कर झाली. या धडकेत रेल्वेच्या बोगी आणि मालगाडीचेही नुकसान झाले. घटनास्थळी पोलिसांची अनेक पथके उपस्थित असून बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेनंतर सियालदह पूर्व रेल्वेने रंगपाणी स्थानकावर कंट्रोल डेस्क उभारला आहे. वरिष्ठ तिकीट कलेक्टर राजू प्रसाद यादव म्हणतात, “आम्हाला अद्याप कोणताही फोन आलेला नाही. दोन स्त्रिया चौकशी करायला आल्या होत्या.”
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट केले की, “NFR परिसरात दुर्दैवी अपघात. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे, NDRF आणि SDRF जवळच्या समन्वयाने काम करत आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.”