सध्या देशभरात मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली आहे. सिक्कीम राज्यात देखील अत्यंत जोरदार पाऊस झाला आहे. सिक्कीमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. या पावसामुळे सिक्कीममध्ये १५०० ते २००० पर्यटक अडकले आहेत. महाराष्ट्रातील देखील अनेक पर्यटक अडकले आहेत. दरम्यान याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथे अडकलेल्या काही पर्यटकांशी फोनवरून संवाद साधला.
सिक्कीम राज्यातील लाँचोंग येथे अनेक पर्यटक अडकले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांची सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या २८ जणांचा एक ग्रुप लाँचोंग येथे अडकवले असून, त्यांना तिथून सोडवून आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करताना दिसत आहेत. सिक्कीम राज्यात मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.