काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलात पाय धुतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर पटोले यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
या घटनेवरून भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.पटोले हे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना वडेगाव येथे एका कार्यक्रमाला गेले असताना सोमवारी ही घटना घडली. यानंतर त्यांनी संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.
त्यानंतर पटोले हे नानासाहेब चिंचोलकर विद्यालयात चिखलातून चालत गेले होते, जिथे लोक पालखी दर्शनासाठी थांबले होते. आपल्या कारकडे परतताना एक व्यक्ती काँग्रेस नेत्याच्या पायाची घाण धुताना दिसली. गाडीजवळ आलेल्या नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय धुणारा कार्यकर्ता बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी विजय गुरव काँग्रेस कार्यकर्ता आहे. नाना पटोले यांच्या या कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेण्याच्या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या घटनेचा एक कथित व्हिडिओ लवकरच सोशल मीडियावर समोर आला आहे.
भाजपच्या मुंबईच्या अधिकृत हँडलवर टीका करत म्हंटले आहे की “काय दुर्दैव आहे की काँग्रेस आपल्या जिवासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा वारंवार अपमान करत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी एका कार्यकर्त्याचे पाय धुवायला लावले कारण त्यांचे पाय चिखलाचे आहेत मग ही काँग्रेसची संस्कृती आहे का?”
तसेच भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी ही कृती काँग्रेसची “नवाबी सरंजामशाही ” मानसिकता असल्याचे म्हटले आणि पक्षाने आणि पटोले यांनी स्वतः कार्यकर्त्याची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे अकोल्यातील एका कार्यकर्त्याने हातपाय धुवून घेतले आहेत. ते जनता आणि कार्यकर्त्यांना गुलामांसारखे आणि स्वत:ला राजासारखे वागवतात. सत्तेत आल्याशिवाय ते लोकांशी कसे वागतात, मग ते सत्तेत आल्यास कसे वागतील याची कल्पना करता येऊ शकते “असे पूनावाला म्हणाले आहेत.