यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला फार मोठा फटका बसला आहे. मुंबईतील ६ जागांवर देखील काही ठिकाणी महायुती पराभूत झाली आहे. त्यातील एक महत्वाची जागा होती ती म्हणजे उत्तर मध्य मुंबई. महायुतीतर्फे उत्तर मध्य मुंबईतून ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांना उमेदवारी दिली हापोटी. तर महाविकासआघाडीने काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. मात्र या लढतीत जनतेने वर्षा गायकवाड यांच्या बाजूने कौल दिला आहे. उज्वल निकम पराभूत झाले असले तरी राज्य सरकारने त्यांना एक मोठे गिफ्ट दिले आहे.
राज्यातील महायुतीने ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्वल निकम यांची नियुक्तीतून सरकारी वकील या पदावर केली आहे. मात्र काँग्रेसने उज्वल निकम यांच्या फेरनियुक्तीला विरोध केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत निकमांच्या नियुक्तीला विरोध केला आहे. दरम्यान मुंबई मध्य उत्तर जागेवर उज्वल निकम आणि वर्ष गायकवाड यांच्या रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. सुरुवातीपासून लीड घेऊन पुढे असणाऱ्या उज्वल निकम यांना केवळ २ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे.