भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंगळवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारवर टीका केली आणि आरोप केला की “हे राज्य त्यांच्या “निर्दयी आणि हुकूमशाही” सरकारमुळे अराजकता आणि दहशतवादाचे केंद्र बनले आहे. “
राज्यातील कथित मतदानानंतरच्या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) चार सदस्यीय तथ्य शोध पथकाचा भाग असलेले प्रसाद म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरुद्ध हिंसाचाराच्या भीतीने दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील अल्ताबेरिया गावातून पळ काढला होता.
त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हंटले आहे की “अल्ताबेरिया गावात, सर्वजण पळून गेले आहेत आणि आम्ही त्या ठिकाणी बसलो जिथे भाजप कार्यकर्ते बसायचे मात्र आता तिथे भीतीपोटी कोणीही येत नाही. गावातील एका मुलगी आम्हाला भेटायला कशीबशी तयार झाली पण ती एवढेच म्हणाली की,. ‘काही बोलू नका’ .
‘माँ माती मानुष’चा नारा देणाऱ्या ममताजींच्या राजवटीत गावकरी दहशतीने पळून गेले आहेत. अराजकता, दहशतवादी, निर्दयी, अलोकतांत्रिक, भ्रष्ट, तुष्टीकरण आणि हुकूमशाही सरकारला याची लाज वाटत्ये आहे का? “
रविशंकर प्रसाद आणि पक्षाचे खासदार बिप्लब कुमार देब, ब्रिजलाल आणि कविता पाटीदार यांच्यासह चार सदस्यीय भाजपचे पथक रविवारी राज्यातील परिस्थितीचे आकलन करण्यासाठी राज्यात आले होते,
भाजप आमदार अग्निमित्रा पॉल यांनी ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील सरकारवर सामाजिक बहिष्कार, जमीन जप्ती आणि पाणीपुरवठा आणि वैद्यकीय सेवा यासारख्या अत्यावश्यक सेवा नाकारणे यासह सामाजिक अन्याय करत असल्याचा आरोप केला आहे.
पॉल म्हणाल्या की, “2021 मध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारे मतदानानंतर हिंसाचार झाला होता, आणि नंतर मात्र काहीही झाले नाही आणि सर्व काही शांततेत होते. मात्र NHRC येथे आले आणि ते प्रकरण चालू आहे. 10,000 लोक आसाममध्ये पळून गेले आहेत आम्हाला ममता बॅनर्जी, त्यांच्या मंत्री आणि पोलिसांकडून कोणतीही अपेक्षा नाही, मात्र आम्हाला न्यायालयाकडून अपेक्षा आहेत, आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू”
राज्याचे नेतृत्व महिला मुख्यमंत्री करत असतानाही शोषणाचे प्रमाण वाढले असल्याचा दावा करत त्यांनी महिलांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकला आहे.
त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनीही पश्चिम बंगालमधील महिलांशी होणाऱ्या वागणुकीवर टीका केली आणि सध्याचे शासन संपवण्याच्या दिशेने काम करण्याचे वचन दिले. “येथे महिलांना सन्मान दिला जात नाही. मात्र आम्ही ही व्यवस्था लवकरच संपवू,” असे ते म्हणाले आहेत.
देब त्यांच्या भेटीतील छायाचित्रे पोस्ट करत एक्स वर म्हणाले आहेत की “तृणमूल काँग्रेसच्या आश्रयाने आलेल्या दुष्टांनी संकुचित राजकीय स्वार्थासाठी एका वृद्ध महिलेच्या कमाईच्या दुकानाची तोडफोड केली, गोसाबा विधानसभा मतदारसंघातील बसंती येथे तिला सर्व सरकारी सुविधांपासून वंचित ठेवले आहे. तिचा मुलगाही जीव वाचवण्यासाठी बेघर झाला आहे. सत्तेचा असा दुरुपयोग लोकशाहीसाठी धोकादायक आणि तिरस्करणीय आहे”.
रविशंकर प्रसाद यांनी कूचबिहारला भेट दिली, जिथे ते एका अनुसूचित जातीच्या महिलेला भेटले जिच्यावर तृणमूल काँग्रेस (TMC) कार्यकर्त्याने कथित हल्ला केला होता. प्रसादच्या म्हणण्यानुसार, महिलेने गुन्हेगाराला त्याला ओळखले असूनही गुन्हेगाराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. “तिने आम्हाला सर्वकाही सांगितले तेव्हा ती रडत होती,” असे ते म्हणाले आहेत.
भाजपच्या तथ्य शोध समितीने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना अहवाल सादर करण्याची आणि पीडितांना मदत करणे सुरू ठेवण्याची योजना आखली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य करत हिंसाचार आणि तोडफोडीच्या अनेक अहवालांच्या पार्श्वभूमीवर हे करण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेन्दू अधिकारी यांनी राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांच्याकडे बंगालमधल्या हिंसाचाराबाबत हस्तक्षेपाची मागणी केली आहे आणि पुढील हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.