पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या राजगीरमधील नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसच्या उद्घाटनापूर्वी आनंद व्यक्त केला.
एक्स वरच्या पोस्टमध्ये पीएम मोदींनी लिहिले की, “आमच्या शिक्षण क्षेत्रासाठी हा खूप खास दिवस आहे. आज सकाळी 10:30 वाजता, राजगीर येथे नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन होणार आहे. नालंदाचा आमच्या गौरवशाली विद्यापीठाशी मजबूत संबंध आहे. भूतकाळातील हे विद्यापीठ तरुणांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी निश्चितच पुढे जाईल.”
आज सकाळी 10.30 वाजता ह्या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.उद्घाटन समारंभाला 17 देशांतील मिशन प्रमुखांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कॅम्पसमध्ये 40 वर्ग असलेले दोन शैक्षणिक ब्लॉक आहेत, त्यांची एकूण आसनक्षमता सुमारे 1900 आहे. यात प्रत्येकी 300 आसन क्षमता असलेले दोन सभागृह आहेत. येथे सुमारे 550 विद्यार्थ्यांची क्षमता असलेले विद्यार्थी वसतिगृह आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय केंद्र, 2000 लोकांना सामावून घेणारे अँफिथिएटर, फॅकल्टी क्लब आणि क्रीडा संकुल यासह इतर विविध सुविधा आहेत.
कॅम्पस हा ‘नेट झिरो’ ग्रीन कॅम्पस आहे. सोलर प्लांट्स, घरगुती आणि पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण संयंत्र, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी वॉटर रिसायकलिंग प्लांट, 100 एकर जलकुंभ आणि इतर अनेक पर्यावरणपूरक सुविधांसह हे स्वयं-सन्स्टेनिंग आहे.
भारत आणि पूर्व आशिया समिट (EAS) देशांमधील सहयोग म्हणून या विद्यापीठाची संकल्पना आहे. त्याचा इतिहासाशी खोलवर संबंध आहे. सुमारे 1600 वर्षांपूर्वी स्थापन झालेले मूळ नालंदा विद्यापीठ हे जगातील पहिले निवासी विद्यापीठ मानले जाते.