एकीकडॆ नुकत्याच पार पडलेल्या G 7 समिट मध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुण्ड्रो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत दोन्ही देशांच्या सहकार्याबाबत चर्चा केली आहे आणि लगेचच आपला दुटप्पी चेहरा उघडा करत कॅनडाच्या संसदेने लज्जास्पद कृती केली आहे.भारताने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरसाठी दोन मिनिटांचे मौन पाळून भर संसदेमध्ये त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची मागच्यावर्षी 18 जूनला एका गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. हरदीप सिंह निज्जर खलिस्तान आंदोलनाशी जोडलेला भारतीय वंशाचा कॅनेडीयन शिख फुटीरता वादी नेता होता. भारत सरकारकडून त्याला दहशतवादी घोषित करण्यात आले होते खालिस्तान टायगर फोर्स या दहशतवादी संघटनेशी तो संबंधित होता.त्याच्या हत्येनंतर कॅनडाच्या सरकारकडून भारत सरकारला या कृतीसाठी जबाबदार धरण्यात आले होते. मात्र भारताकडून याचा स्पष्टपणे निषेध व्यक्त करण्यात आला होता.
कॅनडाने नेहमीच भारतविरोधी आणि फुटीरतावादी नेत्यांचे समर्थन केल्याचे दिसून आले आहे.. येत्या 23 जूनला कनिष्क विमान दुर्घटनेला ३९ वर्ष पूर्ण होत आहेत. हा इतिहासातील एक मोठा विमान अपघात मानला जातो. 23 जून, 1985 ला बॉम्बस्फोटामध्ये हे विमान उडवण्यात आले होते.कॅनडावरून निघालेलया या विमानात असलेल्या 22 क्रू मेंबरसह सर्व 307 प्रवासी मारले गेले होते. प्रवाशांमध्ये बहुतांस भारतीय वंशाने कॅनडाचे नागरिक होते.कॅनडा सरकार, इंटलिजेंस आणि सुरक्षा संस्थांनी अलर्टवर गांभीर्याने चर्चा केली असती तर हा अपघात थांबवता आला असता. याबाबत भारतीय गुप्तचर संस्था आणि सरकारने कॅनडाच्या प्रशासनाला सतर्क केले होते. ऑपरेशन ब्लूस्टारचा बदला घेण्यासाठी शीख बंडखोर एअर इंडियाच्या फ्लाइटला लक्ष्य करू शकतात. असा इशारा देण्यात आला होता.पण त्याकडे कॅनडा सरकारने सपशेल दुर्लक्ष केले होते. कॅनडाच्या चुकीमुळे 300 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता.