ओबीसी समाजासाठी लक्ष्मण हाके हे गेल्या ७ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. सलग ७ दिवस आंदोलन केल्यामुळे लक्ष्मण हाके यांची प्रकृती बिघडली आहे. लक्ष्मण हाके यांना ब्लडप्रेशरचा त्रास होत आहे. उच्च रक्तदाबामुळे हाके यांना हृदयविकाराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हाके यांना तातडीने उपचार घेण्याची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. दरम्यान त्यांनी जाही उपचार घेण्यास नकार दिला आहे. हाके यांचे वजन देखील कमी झाले आहे. त्यामुळे त्यांचा तातडीने उपचारांची गरज निर्माण झाली आहे.
आम्ही मोठे बॅकग्राउंड नसलेले कार्यकर्ते आहोत. आमच्या आंदोलनाची दखल शासनाने आतापर्यंत घ्यायला हवी होती. आम्ही कोणताही राजकीय चेहरा नसलेले कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कदाचित शासनाने आमची दखल घेतली नसावी. दरम्यान मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारणारे मनोज जारांगे पाटलांनी हाके यांच्या आंदोलनावर टीका केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान ओबीसी समजावर अन्याय होऊ नये यासाठी लक्ष्मण हाके यांनी देखील आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान जरांगे पाटलांनी लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर टीका केली आहे. हाके यांचे आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप जारांगे पाटलांनी केली आहे. तसेच आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.