इराणमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.9 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाच्या हादऱ्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामध्ये लोकांची जीव गेला असून अनेक लोक जखमी देखील झाले आहेत.
रझावी खोरासान प्रांतातील काश्मीर काउंटीमध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवले. इराणमधील या भूकंपामुळे चार लोकांची मृत्यू झाला असून 120 जण जखमी असल्याचे समोर आले आहे. भूकंपाची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळाकडे धाव घेतली. भूकंपात जखमी झालेल्या 35 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
भूकंपामुळे येथील जीर्ण इमारतींचे फार नुकसान झाले आहे. भूकंपाचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. त्यात अनेक इमारती ढिगा-याखाली गेल्या असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, येथील परिसरात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मागील वर्षी इराणच्या वायव्य पर्वतीय प्रदेशात झालेल्या भूकंपात तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर ८०० हून अधिक लोक जखमी झाले होते.