आज मुंबईत शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. वरळीमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे आमदार, नवनिर्वाचित खासदार आणि पदाधिकारी तसेच हजारो कार्यक्रते उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला शरद पोंक्षे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनानिमित्त उपस्थिताना मार्गदर्शन करताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, ”आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण लोकसभेची निवडणूक लढलो. तसेच यामध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये सर्वात जास्त स्ट्राईक रेट असलेला पक्ष म्हणून आपला शिवसेना पक्ष पुढे आला. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर संविधान आणि मुस्लिम बांधवांच्या खोटे बोलले गेले तसे आपल्या निशाणीच्या बाबतीत खोटे बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपला स्ट्राईक रेट हा उबाठा पेक्षा जास्त आहे. त्यामुळे इतर कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. मी राज्याचा उद्योगमंत्री म्हणून ठामपणे सांगतो की राज्यातील कोणताही उद्योग परराज्यात गेलेला नाही.”
दरम्यान आजच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यातील अनेक मंत्री त्यामध्ये उदय सामंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, नवनरावचीत खासदार आणि केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव, नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे आणि इतर आमदार व खासदार उपस्थित होते. यावेळी उदय सामंत यांनी लोकसभा व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले.