आज मुंबईत उद्धव बाळासाहबे ठाकरे शिवसेना गटाचा ५८ वा वर्धापन दिन साजरा झाला. मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेचा वर्धापन सोहळा पार पाडला. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार, आमदार आणि प्रमुख नेते व पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याणी सर्वाना मार्गदर्शन केले आणि नरेंद्र मोदी, भाजप, एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ”निवडणुकीच्या निकालानंतर मी म्हणजे उद्धव ठाकरे आता भाजपसोबत जाण्याच्या चर्चा किंवा अफवा पसरवला गेल्या पण ज्यांनी आपल्या मातेसारखी मातेसमान असलेली शिवसेना फोडली आता त्यांच्यासोबत कधीच जायचं नाही आता त्यांची फाटली आहे म्हणून ह्या चर्चा सुरू केल्या असतील. जमलेल्या माझ्या लढवय्या शिवसैनिकांना लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिला आपला जाहीर व कार्यक्रम आणि शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन आहे शिवसेना म्हटल्यावर लोकांमध्ये किंवा शिवसैनिकांमध्ये राज्यातील जनतेमध्ये नवचैतन्य आणि तरुणाई आली पाहिजे. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये मी सर्वांना धन्यवाद दिलेच आहेत मात्र पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने सर्व हिंदू मुस्लिम शिक बौद्ध या सगळ्या धर्मांनी साथ दिल्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो.”
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी शून्य आहे आपण मिळवलेल्या यशाचे मालक तुम्ही आहात आत्मविश्वास आपल्याकडे खूप असेल तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही पण आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे जो अहंकार मोदींमध्ये आहे आता पुन्हा एकदा चर्चा चालू आहे की उद्धव ठाकरे मोदींसोबत जाणार पण ज्यांनी आपली शिवसेना फोडली मातेसमान शिवसेना फोडली त्या नालायकांसोबत परत जायचं का आता त्यांची फाटली आहे त्यामुळे अशा चर्चा ते उठवत आहेत.”