रामायणावर आक्षेपार्ह सादरीकरण केल्याप्रकरणी आयआयटी बॉम्बेने (IIT Bombay ) आपल्या ८ विद्यार्थ्यांना दंड ठोठावला आहे.31 मार्च रोजी आयआयटी बॉम्बेचा वार्षिक कला महोत्सव (IIT Bombay Annual Art Festival) पार पडला. याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रामायणावर आधारित नाटक सादर करण्यात आले.पण रामायणावर आधारित नाटकात श्रीराम प्रभू आणि सितामातेचा अपमान केल्याप्रकरणी काही विद्यार्थ्यांवर आरोप ठेवण्यात आला होता. त्या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशी अंती आयआयटी मुंबईच्या आठ विद्यार्थ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला १ लाख २० हजार रुपयांचा दंड तर, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मार्चमध्ये झालेल्या संस्थेच्या वार्षिक कला महोत्सवात काही विद्यार्थ्यांनी ‘राहोवन’ नावाचे नाटक सादर केले होते. या नाटकात श्रीराम प्रभू आणि सितेचे पात्र चूकीच्या पद्धतीने मांडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. याप्रकरणी काही विद्यार्थ्यांनी तक्रार देखील केली होती. संस्कृती आणि धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा उल्लेख या तक्रारींमध्ये करण्यात आला होता. या तक्रारीनंतर शिस्तभंग कृती समितीची बैठक झाली. विचारविनिमय केल्यानंतर समितीच्या शिफारशीनंतर या विद्यार्थ्यांवर कारवाई झाली आहे.
दरम्यान, याप्रकरणी आयआयटी बॉम्बेकडून मात्र कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.