भारतीय लष्कराच्या जवानांनी शुक्रवारी 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्तर सीमेवर बर्फाळ उंचीवर योगासने करत जनतेला योग दिनाचा अनोखा संदेश दिला आहे.
10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त भारत देशाचे लष्कराचे जवानही हा खास दिवस साजरा करण्यास सज्ज झाले आहे. बर्फाळ प्रदेशातली कडक्याची थंडी असो वा कच्छच्या रणची उजाड भूमी किंवा सीमेवर थंडगार वारा, या सगळ्याचा सामना करत आपले शूर वीर सैनिक योगासने करताना दिसत आहेत . शरिराला आणि मनाला नवी उर्जा देण्यासाठी मोठ्या उत्साहाने योगा दिवस साजरा करत आहेत .
इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सिक्कीममधील मुगुथांग सब सेक्टरमध्ये 15,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर योगासने केली.
तसेच लष्करातील TBP कर्मचारी लेहमधील पँगॉन्ग त्सो येथे योग करताना दिसून आले.
उत्तरेकडील लडाखपासून पूर्वेकडील सिक्कीमपर्यंत, ITBP जवानांनी 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने केली.
ITBP भारत-चीन सीमेवरील विविध उच्च-उंचीच्या हिमालयीन रांगांमध्ये योगासने करून देशातील नागरिकांना प्रोत्साहन दिले आणि एकप्रकारे योगाचे महत्व समजावून सांगितले असे म्हणावे लागेल. यामध्ये सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यातील जवानांचा सक्रिय सहभाग दिसून आला.
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी बीएसएफचे डीआयजी बीएसएफ ब्रिगेडियर पवन बजाज (निवृत्त) यांच्या देखरेखीखाली अटारी, अमृतसर येथील जॉइंट चेक पोस्टवर शून्य रेषेवर योगासने करत असलेल्या बीएसएफ जवानांचे मंत्रमुग्ध करणारे दृश्य पोस्ट केले आहे.