यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभव झाला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे, भाजपचे वरिष्ठ नेते आणि पंकजा मुंडे यांचे समर्थक यांना मोठा धक्का समजला जात आहे. दरम्यान आता पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. त्यासाठी भाजपच्या गोटात हालचाली सुरु असल्याच्या चर्चा होत आहेत. दिल्लीमध्ये भाजप नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. त्यात मुंडेंना राज्यसभेवर पाठविण्याबाबत चर्चा झाल्याचे कळते आहे.
राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा समाजात संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या असे मत भाजपच्या राज्यातील काही नेत्यांचे आहे. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर घेण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडे मागणी करण्यात आल्याचे वृत्त आहे यंदाच्या बीड लोकसभेत भाजपने पंकजा मुंडे यांना तिकीट दिले होते. मात्र बजरंग सोनावणे यांनी अत्यंत वर्षीच्या लढतीत त्यांच्या पराभव केला आहे. पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे त्यांच्या समर्थक अत्यंत निराश झाले असून, काही जणांनी मुडेंचा पराभव झाल्याने आत्महत्या देखील केली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठविण्याची शक्यता आहे. पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले लोकसभेत जिंकल्याने राज्यसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत.