आज १०व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रपती मुर्मू यांनीही योगासने केली.तसेच संपूर्ण जागतिक समुदायाला, विशेषत: भारतीय नागरिकांना आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की योग हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीकडे जाणारा मार्ग आहे.
https://x.com/rashtrapatibhvn/status/1803991572570366311
“योग ही मानवतेला भारताची अनोखी देणगी आहे. वाढत्या जीवनशैलीशी संबंधित समस्या लक्षात घेता, योगासने खूप महत्वाची बनली आहेत. मानसिक आणि आध्यात्मिक तंदुरुस्तीसाठी आपण योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकारण्याचा संकल्प करूया,” असे राष्ट्रपतींनी एक्सवर पोस्ट केले आहे”.
ट्विटरवर आपली योग दिनाची छायाचित्रे पोस्ट करत राष्ट्रपतींनी लिहिले आहे की “योग ही संपूर्ण जगासाठी एक महान भेट आहे”पुढे त्या म्हणतात की , “आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा! योग ही आपल्या सभ्यतेची एक मोठी उपलब्धी आहे आणि संपूर्ण जगाला भारताने दिलेली एक मोठी देणगी आहे. योग हा योग सुधारण्याचा उत्तम मार्ग आहे. शरीर आणि मनाचे आरोग्य हा जीवनाकडे जाणारा एक समग्र दृष्टीकोन आहे जो आपल्या जीवनातील वाढत्या आव्हानांना तोंड देण्यास अधिक सक्षम बनवतो.