ओबीसी नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या आंदोलनाचा आज ८ वा दिवस आहे. दरम्यान आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली आहे. व त्यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच त्याबाबतीत आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रात ६० टक्के हा ओबीसी समाज आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे चुकूनही न पाहणे हा ६० टक्के ओबीसींचा अपमान आहे अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली आहे. मी स्वतः काल त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. एखादा सामाजिक कार्यकर्ता जीव धोक्यात टाकून आंदोलन करत असेल तर सरकारची भूमिका दुट्टपी आणि दुजाभावाची नसावी. दरम्यान तब्बल ९ दिवसानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने हाके व वाघमारे यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र हाके आणि वाघमारे आंदोलनावर ठाम असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरीश महाजन यांच्या फोनवरून हाके यांच्याशी चर्चा केली आहे.
दरम्यान या सर्व प्रकाणावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री निवासस्थानावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे. दरम्यान सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यावेळी इतके दिवस उपोषण करणे आरोग्याला घातक आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी सरकारची भूमिका आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय करू. हाके यांनी त्यांचे शिष्टमंडळ मुंबईला पाठवावे, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहेत.