ओबीसी नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या आंदोलनाचा आज ८ वा दिवस आहे. दरम्यान आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली आहे. व त्यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच त्याबाबतीत आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रात ६० टक्के हा ओबीसी समाज आहे. दरम्यान ओबीसी-मराठा हा संघर्ष वाद पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ”आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाची बैठक होणार आहे. दरम्यान आमचे अहित झाले आहे, असे कोणालाही वाटू नये. हा प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवणार आहे.” दरम्यान या सर्व प्रकाणावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री निवासस्थानावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे. दरम्यान सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यावेळी इतके दिवस उपोषण करणे आरोग्याला घातक आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी सरकारची भूमिका आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय करू. हाके यांनी त्यांचे शिष्टमंडळ मुंबईला पाठवावे, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहेत.